तुझ्या आठवणीँशिवाय आता, जवळ काही ऊरलंच नाही.

तुझ्या आठवणीँशिवाय आता,
जवळ काही ऊरलंच नाही.
सगळंच तु घेऊन गेलीस
मलाही माझ्यात सोडलचं नाही.
तुझ्या आठवणीँशी ही आता,
माझं एक नातं जुळलं आहे.
त्या नात्यालाच या लोकांनी,
' अश्रु ' असं नाव दीलं आहे.
अश्रुंनी भिजलेल्या डोळ्यांना
पुसण्यासाठी आज तु नव्हती
पण अश्रूंनी डोळे भिजवायला
तूझी आठवण माञ सोबत होती
आता मला थोडंस हसणंदेखील
खरच खूप कठीण जातं
कारण लोकांना माझ्या हसण्यातसुद्धा,
लपलेले दुःख दीसून येतं.......

Popular Posts