एकदा येउनी जा,

स्वप्ने माझी तुझ्यापासून आठवणी हि मिळाल्या तुझ्या पासून
तू तर दूर आहेस माझ्यापासून पण नाही वेगळी हृदयापासून.
रेशीम गाठी जन्मोजन्मीच्या जुळल्यादोन मनांच्या
तोड नाही त्याला कशाची भीती कशाला जगाची ...
अशीच एकदा येउनी जा, हाल मनीचे कळवूनी जा
स्वप्ने जी पाहतोय मी , सत्यात ती उतरवुनी जा....
हाल वेड्या मनाचे, कळतील का ग तुला?
कधी हळुवार पणे अचानक, मिठीत घेशील का ग मला?
ध्यानी मनी तूच माझ्या, प्रत्येक श्वासातही तूच,
वेडी माझी प्रीत सखे ग येउनी कधी पाहशील का ?

Popular Posts