ते पावसाचे दिवस आठवतात का रे तुला,

ते पावसाचे दिवस आठवतात का रे तुला,
आपण दोघे त्या भर पावसात फिरायचे...

तू नाही म्हणायचा तरी मी भिजायची
मला एकट बघून तुला राहवत नसे मग मागून तुही यायचा
आठवते का रे तुला ते.....

मी तुझ्याकडे हट्ट करायची मका खाण्यासाठी,
अन् तू नेहमी बहाणा करायचा नाहि देण्यासाठी
आठवते का रे तुला ते.....

तुझ ते वागण मला फार आवडायचे रे,
कारण जर मी रूसली, फुगली
तर तू मला प्रेमानी जवळ घ्यायचा ना रे
आठवते का रे तुला ते.....

आज अस काय झालाय की तुला माझा विसर पडलाय एकदा आठवून बघ ना रे
आठवते का रे तुला मी.....
आठवते का रे तुला मी.....

Popular Posts